डोंबिवलीतील लेबर कॅम्पला भीषण आग;आगीत एका कामगारचा होरपळून मृत्यू

ठाणे – ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली भागातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. डोंबिवली परिसरातील मानपाडा भागात असणाऱ्या एका कामगार छावणीला भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भीषण होती की अनेक किलोमीटर अंतरावरूनही आगीच्या ज्वाळा स्पष्टपणे दिसत होत्या. या आगीत एका कामगारचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. तर एक कामगार गंभीर जखमी असल्याचंही समजलं आहे.

आज सकाळी अचानक लेबर कॅम्पला लागलेल्या या आगीत अनेक संसार उद्धवस्त झाले आहेत. हातावर पोट भरणाऱ्या शेकडो कामगारांना बेघर व्हाव लागलं आहे. दिलासादायक बाब म्हणजे या भीषण अपघातात मोठी जीवितहानी टळली आहे. या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. या दुर्दैवी घटनेनंतर आग आटोक्यात आणली असून परिसर थंड करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

डोंबिवलीतील कल्याण शील रोडवर एक बहुमजली इमारतीचं काम चालू होतं. ज्यामध्ये अनेक मजूर काम करीत होते. आज सकाळी या कामगार छावणीला भीषण आग लागली आहे. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत 170 हून अधिक घरं जळून खाक झाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here