मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात आणि त्यांच्या भाषणात जे काही बोलतात, ते त्यांच्या कृतीतून उतरत नसल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय. अंबरनाथमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. मोदी संसदेत बोलताना फोन करा, म्हणाले. मात्र, आम्ही फोन लावून थकलो. पीएमओमध्ये आमचा फोन कोणीही उचलत नाही, असा टोला सुप्रिया सुळेंनी मोदींना लगावला.
नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या फोनची वाट पाहण्यापेक्षा एक फोन शेतकरी नेत्यांना केलात, तर ते तुमच्याशी बोलायला येणार नाहीत का? असा सवालही त्यांनी विचारला. मोदीजी भाषणात आणि मन की बात मध्ये खूप चांगलं आणि पटेल असं बोलतात, पण त्याची कृती होत नाही, याचं दुःख होतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.






