गुजराती सिनेमा आयकॉनिक फिल्म अवार्ड (GIFA) सोहळा संपन्न

गुजराती सिनेमा

मुंबई (उपसंपादक दिनेश आशिवाल) । गुजराती सिनेमाच्या इतिहासात नोंद घ्यावा असा सोहळा गुजराती आयकॉनिक फिल्म अवार्ड (GIFA) 2025 सोहळा २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अहमदाबादच्या नारायणी हाइट्स होटलमध्ये संपन्न झाला. हा सोहळा गुजराती सिनेमाच्या ‘गोल्डन डिकेड’च्या उपलक्ष्यात आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये २४ श्रेणींमध्ये अवार्ड्स देण्यात आले. या सोहळ्याला वेस्टर्न इन्डिया फिल्म एन्ड टी व्ही प्रोड्यूसर्स एसोसिएशनचे सन्मानीय अध्यक्ष संग्राम शिर्के, उपाध्यक्ष हिराचंद दंड उपस्थित राहिले होते. या पुरस्कार सोहळ्याचे हे १० वे वर्ष होते. गुजराती सिनेमा इंडस्ट्रीतील दिग्गज नामाकिंत कलाकार, दिग्दर्शक मंडळी उपस्थित होती. विविध कालारांगणी या सोहळ्याला बहारदार रंगत आली.

GIFA हा गुजराती सिनेमाच्या उत्कृष्टतेचा प्रतीक असणारा एक प्रतिष्ठित पुरस्कार समारंभ आहे, जो गुजराती सिनेमाच्या कलाकारांना, निर्मात्यांना आणि तकनीकज्ञांना गौरवितो. या वर्षी, ८६ गुजराती फिल्म्सपैकी ७२ फिल्म्सने नामांकन प्रक्रियेत भाग घेतला होता. सोहळ्याच्या मुख्य आकर्षणांमध्ये सर्वश्रेष्ठ फिल्म, सर्वश्रेष्ठ निर्देशक, सर्वश्रेष्ठ अभिनेता आणि अभिनेत्री, सर्वश्रेष्ठ संगीत, गीत, आणि बैकग्राउंड स्कोर यांचा समावेश होता. जूरी पैनलमध्ये मिहिर भुता, विनोद गणात्रा, श्रीनिवास पाट्रो, बिपिन बापोदरा, शीतल शाह, जिग्नेश पटेल, बुरझिन उनवाला, आणि राकेश पुजारा यांसारख्या प्रसिद्ध हस्तींचा समावेश होता.
GIFA 2025 सोहळ्याचे आयोजन Nuvoco Cement ने टाइटल स्पॉन्सर म्हणून, Vasant Masala ने मुख्य स्पॉन्सर म्हणून, Vraj Jewellers आणि Gujarat Tourism ने एसोसिएट स्पॉन्सर म्हणून, Connplex ने सिनेमा पार्टनर म्हणून, आणि Radio Fever ने रेडियो पार्टनर म्हणून केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here