जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय मेहरुण येथे जागतिक महिला दिनानिमित्त एक आगळावेगळा आणि संस्कारपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या विशेष प्रसंगी विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींच्या पाया पडून त्यांचा सन्मान करत नारी शक्तीप्रती आदर व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांना मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमात महिला सन्मान, समानता आणि परस्पर आदर यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी भाषण, कविता आणि नाटिकेद्वारे स्त्री शक्तीचे समाजातील योगदान अधोरेखित केले.
मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक त्यांच्या मार्गदर्शना खाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पर्यवेक्षिका शितल कोळी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “स्त्रीचा सन्मान म्हणजे संस्कारांची खरी जपणूक. परस्पर आदर आणि समानता हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे.”
या उपक्रमामुळे शाळेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांमध्ये महिलांविषयी आदराची भावना अधिक दृढ झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली आव्हाड मॅडम यांनी केले कार्यक्रमाला सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.







