मुंबई विमानतळावर १२ कोटींचे ड्रग्ज आणि लाखांचे सोने जप्त; ५ प्रवाशांना बेड्या

mumbai-airport
file photo

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) । मुंबई विमानतळ सीमा शुल्क आयुक्तालय झोन ३ च्या अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थ आणि सोन्याच्या तस्करीविरोधात ३ मार्च ते १० मार्च या कालावधीत करण्यात आलेल्या विविध कारवायांमध्ये तब्बल १२.०३१ किलो हायड्रोपोनिक वीड आणि मोठ्या प्रमाणावर सोने जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत अंदाजे १२.०३ कोटी रुपये आहे.

कस्टम्स अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयास्पद हालचाली आणि ‘एपीआयएस’ (APIS) प्रोफाइलिंगच्या आधारे तपासणी केली असता हायड्रोपोनिक वीड तस्करीची चार प्रकरणे उघडकीस आली. हे अंमली पदार्थ बँकॉकमधून आलेल्या पाच प्रवाशांकडून हस्तगत करण्यात आले. या प्रवाशांविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
अंमली पदार्थांसोबतच सोन्याच्या तस्करीचे तीन प्रयत्नही कस्टम्सने उधळून लावले आहेत. वेगवेगळ्या तीन प्रकरणांमध्ये प्रवाशांकडून ४०९ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले, ज्याची किंमत सुमारे ५९.५७ लाख रुपये आहे. हे सोने बेकायदेशीरपणे लपवून आणले जात होते. याप्रकरणी सीमा शुल्क कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई कस्टम्स झोन-३ च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या यशस्वी कारवाईमागे आधुनिक तंत्रज्ञान आणि डेटा अ‍ॅनालिटिक्सचा मोठा वाटा आहे. प्रवाशांची अचूक प्रोफाइलिंग आणि स्पॉट तपासणीमुळे संशयास्पद हालचाली वेळेत ओळखणे शक्य झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here