गुन्हा दाखल न करण्यासाठी बंडगार्डन पोलीस स्टेशनमधील उपनिरीक्षकाने मागितली लाच

bribe-to-police
file photo

पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर सुहास गायकवाड) | गुन्हा दाखल न करण्यासाठी बंडगार्डन पोलीस स्टेशनमधील उपनिरीक्षकाने दोन लाख रुपयांची मागणी केली. या प्रकरणी एसीबीने सापळा रचत कारवाई केली असून, पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

एसीबी’ने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीच्या विरोधात एका व्यक्तीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फसवणुकीसंदर्भात अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी पोलिस उपनिरीक्षक संदीप खेडकर (रा. वानवडी) करत होते. मात्र तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी खेडकर यांनी दोन लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने तीन फेब्रुवारी रोजी ‘एसीबी’कडे तक्रार केली. तक्रारदाराच्या तक्ररीवरून लाचलुचपत विभागाने सापळा रचला. पडताळणीदरम्यान खेडकर यांनी स्वतःसाठी आणि वरिष्ठांसाठी मिळून तडजोडीअंती एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले असून आता याच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here