पुण्यात दहावीचा गणिताचा पेपर लीक, टेलिग्राम ग्रुपवर तीन दिवस आधीच प्रश्नपत्रिका व्हायरल

गणिताचा पेपर लीक

पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर सुहास गायकवाड) | राज्यात दहावी बोर्डाची परीक्षा सुरु आहेत. राज्य मंडळाने कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून शर्थीचे प्रयत्न केलेत. मात्र पुण्यात दहावीचा गणिताचा पेपर टेलिग्रामवर लीक झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुणे बोर्डाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

दहावीचा गणित भाग-१ आणि भाग-२ चे पेपर परीक्षा होण्यापूर्वीच एका टेलिग्राम होण्यापूर्वीच एका टेलिग्राम ग्रुपवर प्रसारित झाले. विशेष म्हणजे गणित भाग-२चा पेपर तीन दिवस आधीच ग्रुपवर टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. बोर्डाने अधिकृत प्रश्नपत्रिकेशी पडताळणी केली असता दोन्ही पेपर तंतोतंत जुळल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. टेलिग्राम ग्रुप अॅडमिन व सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here