रायसोनी इस्टीट्युटचे प्रा. प्रशांत देशमुख यांना पीएचडी प्रदान

जळगाव (प्रतिनिधी) – प्रा. प्रशांत देशमुख यांना नुकतीच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे कॉमर्स अँड मॅनेजमेंट विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली. ते जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिसिनेस मॅनेजमेंट येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी “अ स्टडी ऑन बीइंग बिहेव्हर ऑफ ऑनलाईन कस्टमर इन अकोला अँड अमरावती ” या विषयावर सखोल संशोधन करून प्रबंध सादर केला. मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. बी. एस. झारे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रीती. अग्रवाल तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here