बिग बॉस १४ ची विजेती ठरली रुबिना दिलैक…मराठमोळा राहुल वैद्य ठरला उपविजेता

मुंबई (प्रतिनिधी) – बिग बॉस १४ ची विजेती ठरलेली रुबिना दिलैक ही या सीजनच्या महिल्या दिवसांपासून सर्वोत्कष्ट खेळ खेळताना दिसली. घराच्या प्रत्येक विषयावर तिने उघडपणे आवाज उठवला. आणि सुरवातीपासूनच खेळाच्या दरम्यान तिचा रुबाब आणि खेळण्याची पद्धत पाहून पहिल्या दिवसांपासून ती विजेती होणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. कुठल्याही मुद्द्यावर संकोच न बाळगता ती तीचे मत देत होती. अगदी सुरवातीच्या टप्प्यात तिने शो चा सूत्रधार सलमान खानशी सुद्धा पंगा घेतला होता.

बिग बॉसच्या घरात पती अभिनव शुक्ला सोबत रुबिना दिलैकने प्रवेश केला होता.तिचा प्रवास खुप मजेशीर होता. तिचे आणि अभिनवचे नाते एका नाजूक वळणावर असताना त्यांनी प्रवेश केला होता. घरातील सदस्यांना याची कल्पना सुद्धा नव्हती. ज्यावेळी घरात त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितले तेव्हा सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र घरात आल्यावर त्यांच्या नात्यामध्ये सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. ते दोघे अधिक जवळ आले. आणि त्यांचे नाते घट्ट झाले.

रुबिनाचा घरातील प्रवास हा पाहण्यासारखा होता. तिला कठीण प्रसंगातून जावे लागले. शो दरम्यान इतर स्पर्धकांनी तिच्यावर अनेकदा विविध आरोप सुद्धा केले. प्रत्येकवेळी तिचा आणि राहुल वैद्यचा वाद सुद्धा झाला. तिला कधी कोणी कडक शिक्षक असल्याचे म्हणत असे तर कोणी तिला डॉमिनेटिंग म्हटले. पण ती कधीच डगमगली नाही. आणि ती राहुल वैद्यला टक्कर देण्यासाठी अंतिम फेरीतसुद्धा पोहचली. तिला राहुनने कडवी झुंज दिली. मात्र शेवटी विजय रुबिनाचा झाला आणि राहुल या शो चा उपविजेता ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here