सुप्रसिद्ध गीतकार संतोष आनंद यांची पैशासाठी वणवण…

मुंबई (प्रतिनिधी) – हिंदी चित्रपटसाठी उत्तमोत्तम गाणी लिहिणारे संतोष आनंद यांना वृद्धापकाळात पैशासाठी वणवण करावी लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. ते पैशासाठी वणवण भटकत आहेत. गीतकार संतोष आनंद हे काही दिवसांपूर्वी इंडियन आयडल शो मध्ये आले होते. त्यावेळी आपली सद्य स्थिती त्यांनी कथन केली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचे डोळे पाणावले.

“एक प्यार का नगमा है”, “जिंदगी की ना टूटे लड़ी”, “मैं ना भुलूंगा”, “मोहब्बत है क्या चीज” अशी अजारामर गाणी लिहणारे संतोष आनंद जी आपले जीवन हलाखीच्या परिस्थिती जगत आहेत. त्यांनी या शो दरम्यान आपण अनेक वर्षानंतर मुंबईत आल्याचे सांगितले. मला मुंबईत येवून चांगलं वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मी एका उडणाऱ्या पक्षाप्रमाणे मुंबईत यायचो आणि निघून जायचो. कितीतरी रात्री मुंबईत जागून मी चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. आज मला दिवसही रात्र वाटू लागली आहे.

संतोष आनंद यांच्या तोंडून हे सर्व ऐकल्यानंतर सर्वजण आपले अश्रू रोखू शकले नाहीत. आणि या शो ची जज असलेली नेहा कक्कर हिने संतोष आनंद यांना ५ लाख रुपये देवू केले मात्र त्यांनी ते घेतले नाही. त्यावेळी ते भावूक सुद्धा झाले. आणि त्यांनी सांगितले की, मी स्वाभिमानी आहे, आजपर्यत मी कुणाकडे हात पसरला नाही. मी आजही मेहनत करुन खातो. मात्र नेहाने खूप विनवण्या केल्यानंतर त्यांनी हे पैसे स्विकारले आणि सर्वांच्या चेहऱ्यावर एकच आनंद पाहायला मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here