मुंबई (प्रतिनिधी) – बॉलिवुड अभिनेत्री बिपाशा बसु ही आपल्या पतीचा वाढदिवस मालदीवमध्ये साजरा करत आहे. बिपाशा ही सोशल मिडीयावर सर्वाधिक सक्रीय असते. तिने आपला पती करण सिंह ग्रोवरसोबत बोल्ड फोटो काढून ते व्हायरल केले आहेत.
बिपाशा ही आपला पती करणचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला पोहचली आहे. करण सिंह ग्रोवर आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे.
बिपाशाने आपल्या पतीना खास संदेश लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. ‘या वर्षाचा माझा दुसरा सर्वात आवडता दिवस आला आहे. तो म्हणजे करणचा वाढदिवस…आय लव यू…’
या सुट्टीच्या दिवसात बिपाशाने आपले बोल्ड फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती समुद्र किनाऱ्यावर सिजलिंग पोजमध्ये उभी असलेली पाहायला मिळत आहे. बिपाशाने शेअर केलेले फोटो पाहून हेच लक्षात येते की, ती आपल्या पतीसोबत आपली सुट्टी मजेत घालवत आहे. ती आपला सर्वाधिक वेळ समुद्र किनाऱ्यावर घालवताना दिसून येत आहे. बिपाशा आणि करण एक दुसऱ्यांना आपला वेळ देवून सुटुटीची मजा घेत आहेत.






