मुंबई (प्रतिनिधी) – अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम लवकरच एका मालिकेच्या माध्यमातून ‘नवे लक्ष्य’ गाठणार आहे. एका मालिकेच्या माध्यमातून मराठी कलाविश्वात सोहम पदार्पण करणार आहे. सोहम हा ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत पोलिसांची भूमिका साकारणार आहे. महाराष्ट्र पोलिस दल हे राज्याच्या जनतेसाठी अहोरात्र मेहनत करत आहे. याच पोलिसांची शौर्यगाथा या मालिकेच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न सोहम करणार आहे.
सोहमची ही पहिलीच मालिका असणार आहे. तो नेमका या मालिकेत कसा अभिनय करतो हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. पोलिसांच्या जीवनावर आधारित अनेक मालिका आणि चित्रपट सुद्धा प्रसिद्ध झाले. मात्र या मालिकेत वेगळे काय असणार आहे. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आदेश बांदेकर या मालिकेची निर्मिती करतआहेत.






