बक्षीसाच्या बहाण्याने महिलेला 41 हजारांचा ऑनलाईन गंडा

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – अॅमेझॉनमधून बोलत असल्याचे सांगून सायबर चोरट्याने बाणेर येथील एका महिलेला बक्षीस लागल्याची बतावणी करून ऑनलाईन 41 हजार रूपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी 45 वर्षीय महिलेने तक्रार दिली असून चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी फिर्यादी महिलेच्या मुलाच्या मोबाईलवर एकाने फोन केला. त्याने अॅमेझॉनवरून बोलत असल्याचे सांगत संबंधित मोबाईल क्रमांकावर बक्षीस लागल्याची बतावणी केली. त्यानंतर सायबर चोरट्याने महिलेला लिंक पाठवून कोड दिला. त्याद्वारे माहिती घेऊन महिलेला गुगल पे खात्यावरून 41 हजार पाठविण्यास सांगून फसवणूक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here