‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाद्वारे अलियाचा दमदार अंदाज

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – अभिनेत्री आलिया भट्टने ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाचं पोस्टर शेअर करत सिनेमाच्या प्रदर्शनाची घोषणा केलीय. पोस्टर रिलीज केल्यानंतर अवघ्या काही तासातचं या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आलाय. या सिनेमाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचवली आहे. येत्या 30 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमाच्या टीझरमध्ये आलियाचा कधीही न पाहिलेला अंदाज समोर आलाय. आलियाची दमदार चाल, तिचा भारदस्त आवाज आणि करडी नजर यावरुन तिने भूमिकेसाठी भरपूर मेहनत घेतल्याचं दिसून येतंय. कामाठिपुरा इथल्या वैश्या व्यवसायात दबदबा असलेल्या गंगूबाईचा संघर्षमय प्रवास या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. मुंबईतील माफियांच्या टोळीत असलेल्या गंगूबाईचा बेधडक स्वभाव आणि तिच्या आयुष्यातील टप्पे सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी केलाय. संयज लीला भन्साळी यांच्या वाढदिवसानिमित्तानं टीझर रिलीज करण्यात आला आहे.

आलिया भट्टने सोशल मीडियावर टीझर शेअर करत दिग्दर्शक संजय लीली भन्साळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “मला वाटतं तुमचा वाढदिवस साजरा करण्याचा याहून वेगळा मार्ग असूच शकतं नाही. मी माझ्या हृदयाचा आणि आत्म्याचा एक भाग तुमच्या समोर सादर करतेय..भेटा गंगूला!” असं कॅप्शन देत आलियाने संजय लीला भन्साळी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अवघ्या काही तासातच आलियाने शेअर केलेल्या व्हिडीओला दोन लाखांहून अधिक लाईकस् मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here