मुंबईत सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यावर मनपाची कारवाई

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – मुंबईत आता दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढु लागला आहे. आणि त्यात कळस म्हणजे मुंबईकर विनामास्क फिरताना दिसून येत आहेत. मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. मुंबई महानगर पालिकेने मंगळवारी सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उचलला. जवळपास १४ हजार ६०० नागरिकांकडून तब्बल २ लाख रुपये दंड वसूल केला आहे. मार्च २०२० पासून मास्क न घालणाऱ्या १५ लाख नागरिकांकडून ३०.५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त आय.एस.चहल यांनी कडक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्याकडून २०० रुपये दंड आकारण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. तर दरदिवशी २५ हजार जणांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आयुक्तांच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस मार्शलची संख्या दुप्पट करण्यात आली आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेने आत्तापर्यत ९१ हजार ८०० रुपये दंड स्वरुपात वसूल केले आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या आकडेवारीनुसार नागरी यंत्रणा दररोज १३ हजार लोकांकडून सरासरी २५ लाखांहून अधिक दंड वसूल करीत आहेत. मुंबईत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करावे लागू नये, यासाठी राज्य सरकारची धडपड सुरु आहे. त्याला नागरिकांनी सुद्धा सहकार्य करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here