झारखंड – येथील गुमला जिल्ह्यातील कामदारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बुरुहातू या गावातील एकाच कुटुंबातील ५ जणांच्या पायाचे तुकडे तुकडे करुन त्यांची हत्या करण्यात आली आहे. या ५ जणांच्या मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडालीआहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
परस्पर वादातून हे हत्याकांड घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिस या एकाच कुटुंबातील सर्व जणांची एकत्र हत्या केल्यानंतर गावकरी या हत्येमागील कारण सांगण्यास तयार नाहीत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ५ जणांना ठार मारल्यामुळे संपूर्ण गाव दहशतीखाली असल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर झारखंडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात सत्ता बदल झाल्यापासून गुन्हेगार निर्भय झाले आहेत. आणि कोणाचीही भिती न बाळगता गुन्हा करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे, असा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला आहे.






