परवानगीशिवाय घेतलेला हळदी-कुंकू कार्यक्रम घेणे भाजप नगरसेविकेच्या अंगलट

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पोलिसांच्या परवानगीशिवाय हळदी-कुंकू कार्यक्रम घेणे भाजप नगरसेविकेच्या अंगलट आले आहे. करोना नियमावलीचे पालन न करता 1,800 ते 2,000 लोकांची गर्दी जमवून कार्यक्रम घेतल्याप्रकरणी भाजपच्या विद्यमान नगरसेविकेसह माजी नगरसेविकेविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे शहरात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम घेताना शासकीय नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, कार्यक्रमाची परवानगी न घेता विजयालक्ष्मी हरिहर यांनी महात्मा फुले वाडा परिसरात १८०० ते २००० लोकांची गर्दी जमविली. त्याशिवाय सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना स्टेज टाकून तिळगूळ वाटप आणि भेटवस्तूचे वितरण केले. 22 फेब्रुवारीला गंजपेठेतील महात्मा फुले वाडा रस्ता परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना नियमावलीचे पालन न केल्याप्रकरणी नगरसेविका विजयालक्ष्मी हरिहर, विष्णू हरिहर आणि निर्मल हरिहर (सर्व गुरूवार पेठ) अशी गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी खडक पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here