स्लमडॉग मिलियनेयरमधील अभिनेता मधुर मित्तल विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – स्लमडॉग मिलियनेयर या चित्रपटात समीर मलिकची भूमिका साकारलेला अभिनेता मधुर मित्तल यांच्या विरोधात खार पोलिस ठाण्यामध्ये त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १३ फेब्रुवारी २०२१ रोजी घडलेली आहे. तक्रारदार महिला वांद्रे येथे राहणारी आहे.

मधुरने तिच्या घरात घुसून तिला मारहाण केल्याचा आरोप एक्स गर्लफ्रेंडने केला आहे. २०२० च्या डिसेंबरमध्ये मधुर मित्तल याची फिर्यादीसोबत ओळख झाली होती. नंतर मधुर मित्तलने फिर्यादीवर दारुच्या नशेत जबरदस्ती केल्याचे फिर्यादीने सांगितले आहे. तक्रारदार महिलेचे वकील निरंजन शेट्टी यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे.

११ फेब्रुवारी रोजी तक्रारदार पीडित महिलेने मधुर सोबतचे सर्व संबंध तोडले. याचा राग मनात धरुन मधुरने पीडीत महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण केली.तिचे केस खेचले, तिच्यावर शारीरिक अत्याचार केला आणि प्राणघातक हल्ला केला. तिच्या चेहऱ्यावर, मान, छाती, हात, पाठ आणि कान, डोळे यांना जखमा झाल्या आहेत.

मधुरवर विनयभंग, लैंगिक छळ आणि अत्याचार या कलमाखाली गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. मधुर जयपूरमध्ये एका डिजिटल सिरीजच्या शुटींगमध्ये आहे. तो मुंबईत आल्यावर त्याची पोलिस चौकशी करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here