रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – आमदार शिरीष चौधरी यांच्या स्वीय सहाय्यकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आ.चौधरी यांनी देखील मुंबईत स्वॅब दिला असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
आमदार शिरीष चौधरी यांच्या समवेत राहणारे त्यांचे खाजगी स्वीय सहाय्यक सूर्यभान मेढे यांचा करोना चाचणी अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर ते घरीच विलगीकरणात आहे.मेढे यांचा अहवाल सकारात्मक आल्याने,मुंबई असलेल्या आमदार चौधरी यांनी देखील त्यांची करोना चाचणी केली आहे,मात्र अद्याप त्यांचा रिपोर्ट प्राप्त झाला नव्हता.






