जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकुळ सुरूच असून आज पुन्हा ३६३ रुग्ण आढळले असून सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहर १६२ आणि चाळीसगाव तालुक्यातील ५३ आहेत. यामुळे जळगाव जिल्ह्यातील संसर्ग कायम असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
आज आढळलेल्या ३६३ रुग्णांमध्ये जळगाव शहर-164, जळगाव ग्रामीण-6, भुसावळ-6, अमळनेर-24, चोपडा-30, पाचोरा-3, भडगाव-3, धरणगाव-3, यावल-2, एरंडोल-11, जामनेर-3, रावेर-8, पारोळा-17, चाळीसगाव-53, मुक्ताईनगर-18, बोदवड-9 आणि इतर जिल्हे-3 असे एकुण 363 असा समावेश आहे.
जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या आजच्या अहवालात एकुण 59 हजार 585 बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 56 हजार416 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर 1 हजार 790 बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज भुसावळ तालुक्यातील दोन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.







