कोट्यावधी रूपये खर्च करून बांधलेल्या वसाकाच्या संरक्षक भिंतीना पडले भगदाड

  • कोट्यावधीची मालमत्ता धोक्यात
  • प्रशासनाचे साफ दुर्लक्ष

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – जिल्ह्यातील चार तालुक्याचे विकासाचे मुख्य केंद्र असलेल्या वसाकाची अंत्यत दुरावस्था होण्याच्या मार्गावर असुन वसाकामधिल सुरक्षा यंत्रणा तोकडी पडत आहे सुरक्षा कर्मचाऱ्यांना गत ७ ,८ महिन्यापासुन वेतन नसल्याने ते पुरेशा संख्येने कामांवर येत नसल्याने २८,००० सभासद असलेल्या व ३०० कोटीची स्थावर मालमत्ता असलेल्या वसाकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सन १७/१८ मध्ये धाराशिव या उद्योग समुहाला , महाराष्ट्र राज्य शिखर बॅंकेने स्थानिक लोकप्रतिनींच्या मदतीनें २५ वर्षांसाठी भाड्याचे दिला आहे सन २०१७/१८ मध्ये कामगारांशी करार करण्यावरुन वाद निर्माण झाले , त्यामुळे हंगाम संपण्यापूर्वीच कारखाना बंद पडला, गत वर्षी धाराशिवच्या संचालक मंडळाने कारखाना सुरू न झाल्याने शेंकडों कामगार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता,अशा परीस्थितीत यावर्षी वसाका सुरू होईल या आशेवर वसाकाचे शेतकरी कामगार आस लावुन बसले आहेत
वसाकाच्या स्थानावर मालमत्तेच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र शासना ने सहा महिन्यांपूर्वी अवसायकाची नेमणुक केली आहे, तरी वसाकाची यंत्र सामुग्री सुरक्षित व जैसै थे ठेवण्याची जबाबदारी असूनही मालमत्तेचे नुकसान होत आहे, सुरक्षा रक्षकांची संख्या मर्यादित असल्याकारणाने व त्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने ते कामांवर येत नाही त्यामुळे त्यांना २४ तास सगळीकडे लक्ष देता येत नसल्याने कारखाना कार्यस्थळावरील दक्षिण बाजुला असलेली अतिशय भक्कम व मजबुत बांधकाम असलेली दगडी संरक्षक भिंत जागोजागी पाडण्यात आली आहे लोखंडाचा वापर करून बांधण्यात आलेली दगडी प्रत्यक्ष पहाणी केल्यावर निदर्शनास येते ,सन २०११/१२ मध्ये बांधलेल्या संरक्षक भिंतीकरीता कोट्यावधी रूपये खर्च केला असून तिची अशा पध्दतीने पडझड व मोडतोड बघितल्यावर सभासद व कांमगांराचा संताप अनावर होत आहे.

एकीकडे वसाकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना कारखाना सुरू करणे साठी कामगारांच्यावतीने शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, धाराशिव कारखाना प्रशासनाने लवकर पुढाकार घेवुन ,कामगार संघटनेशी ,कामगार उपायुक्त यांच्यासमोर झालेल्या लेखी चर्चेनुसार त्वरीत करार करुन , कारखाना सुरू करणेसाठी पुढे यावे, अशी मागणी कामगार संघटनेकडून करण्यात येत असल्याची माहिती वसाका कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक देवरे, कार्याध्यक्ष कुबेर जाधव यांनी दिली आहे.

कसमादेचे विकासाचे मुख्य केंद्र असलेल्या वसाका ची दुरावस्था व पडझड थांबवणं गरजेचं असुन ,स्वर्गिय कर्मवीर ग्यानदेव दादांनी उभी केलेली वास्तू सुरू करणे गरजेचं आहे, कुबेर जाधव ,को़षlध्यक्ष वसाका मजदुर युनियन २) सहकारी संस्थेची दुरावस्था थांबवून ती सुरु राहणे गरजेचे आहे , धाराशिव प्रशासनाने तात्तकाळ कार्यवाई करावी व पडलेली संरक्षक भिंत तात्काळ बांधुन पुर्ववत करुन, वसाकाच्या मालमत्तेच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.
– प्रभाकर पाटील, अध्यक्ष, उस उत्पादक संघर्ष समिती वसाका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here