पोलीस कोविड केअर सेंटरला वेद फाऊंडेशनची सदिच्छा भेट

मुंबई (प्रमिला जाधव) – मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री मृत्युंजय हिरेमठ यांच्या अथक परिश्रमातून पोलीस दलातील कोरोना संक्रमित अधिकारी वर्गासाठी निर्मित कोवीड केयर सेंटर ला वेद फाऊंडेशन अध्यक्ष स्वप्निल वाडेकर तथा सहकारी प्रमिला जाधव यांनी नुकतीच भेट दिली.
बृहन्मूंबई महानगरपालिका सी वाॅर्ड अंतर्गत मरीन लाईन्स येथील पोलीस जिमखाना येथे पोलीस निरीक्षक श्री मृत्युंजय हिरेमठ यांनी कोवीड केयर सेंटर तयार केले असून त्यात सध्या १८ कोरोना संक्रमित अधिकारी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊन च्या या टप्यात मरीन ड्राईव्ह येथील रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ती हाताळतांना पोलीस दलास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. दूर्दैवाने २ अधिकाऱ्यांचे यात निधन झाले आहे. वेद फाऊंडेशन अध्यक्ष स्वप्निल वाडेकर यांनी या सेंटर ला भेट देऊन पाहणी केली तथा कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली. याप्रसंगी उपस्थित अधिकारी वर्गास प्रसाधन किट सुपूर्द करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here