दोंडाईचा (संतोष कोळी) – दि 15 जुलै रोजी शिवसेनेचे धुळे जिल्हा सम्पर्क प्रमुख बबनराव थोरात व सहसंपर्क प्रमुख अतुलभाऊ सोनवणे यांच्या आदेशाने शिवसेनेचे शिंदखेडा विधानसभा क्षेत्रप्रमुख , माजी जि प सदस्य छोटू पाटील यांच्यातर्फे होळ ता. शिंदखेडा येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड 19 वर मात करण्यासाठी जनतेची प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी होमिओपॅथीच्या गोळ्या सहायक पोलिस निरीक्षक श्री.राजगुरू यांच्या हस्ते वाटण्यात आल्या. यावेळी ग्रामस्थांचे शरीराचे तापमान देखील तपासण्यात आले.
याप्रसंगी शिवसेनेचे विभागप्रमुख विजय सिसोदे, शहरप्रमुख नंदकिशोर पाटील, शहर संघटक सागर देसले, होळचे सरपंच प्रभाकर ठाकरे, उपसरपंच भटू ठाकरे, माजी सरपंच सुनील पाटील, पो.कॉ. माळी नाना, प्रविण पवार, रावसाहेब वानखेडे, ईश्वर पाटील, यांच्यासह होळचे ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ व शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
Home Uncategorized कोरोनाच्या पार्शवभूमीवर होळ ता शिंदखेडा येथे होमिओपॅथीच्या गोळ्या सहायक पोलिस निरीक्षक...







