अखेर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस पिक विमा मंजूर; शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांचे पाठपुराव्याला यश

धुळे (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सद्यस्थितीत खरीप हंगामाची लगबग सुरु आहे. आजपर्यंत धुळे जिल्ह्यात खरीप हंगामाची पेरणी जवळ जवळ पूर्ण झाली आहे. धुळे जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर नगदी पिक म्हणून कापसाची लागवड होत असते. त्यामुळे शेतकरी जुन व जुलै महिन्यांत बँकाकडून खाजगी सावकारांकडून पिक कर्ज घेऊन शेतीत पैसे टाकत असतात. सोबत पिकविमा देखील काढत असतात.
मागील खरीप हंगाम सन 2019 मध्ये देखील धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापुस, मका, ज्वारी, बाजरी, मुगसह फळपिकांचा पिकविमा काढलेला होता. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ॲग्रीकल्चर इंन्सुरन्स कंपनीतर्फे पिकविमा काढलेला होता. सदरील कंपनीने खरीप हंगाम सन 2019 चा कापूस सोडून इतर पिकांचा पिकविमा मंजूर केला. परंतु कापुस पिकांचा पिक विमा मंजुर केलेला नव्हता. याबाबतीत शिंदखेडा तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. हेमंत साळुंके यांचेकडे कापूस पिकविमा मिळावा म्हणून तक्रार केलेली होती. त्याची दखल घेऊन श्री. हेमंत साळुंके यांनी पिकविम्याची संपूर्ण माहिती घेवून कृषी मंत्री ना दादाजी भुसे, पालकमंत्री ना.श्री.अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी श्री.संजय यादव यांना पत्र पाठवून कापुस पिक विमा न देणाऱ्या ॲग्रीकल्चर इंन्सुरन्स कंपनीवर कार्यवाही करा अशा प्रकारची मागणी करुन दबाव निर्माण केला होता. व याबाबतीत ॲग्रीकल्चर इंन्सुरन्स कंपनीचे अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, व कृषीमंत्री व पालकमंत्री यांचेकडे सतत पाठपुरावा चालूच ठेवला होता. अखेर सदर पाठपुराव्याला यश येवून धुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला व ॲग्रीकल्चर इंन्सुरन्स कंपनीने शेतकऱ्यांचा कापुस पिकविमा मंजूर केला.
धुळे जिल्ह्यातील 44 हजार 859 शेतकऱ्यांनी 17 कोटी 57 लाख 15 हजार 600 रुपये पिकविमासाठी भरलेले होते. त्यापैकी 39 हजार 345 शेतकरी म्हणजेच जवळ जवळ धुळे जिल्ह्यातील 78 टक्के शेतकऱ्यांना 72 कोटी 67 लाख रुपये पिकविमा मंजुर करण्यात आला आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. हेमंत साळुंके यांनी दिली आहे.
याबद्दल शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. हेमंत साळुंके यांचे आभार मानलेत. संकटाच्या काळात शिवसेना आमच्या पाठीशी खंबीर उभी असते अशा भावना शेतकऱ्यांनी हेमंत साळुंके यांचेकडे व्यक्त केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here