शहरातील विविध भागात धर्मरथ फाऊंडेशनतर्फे आरोग्य तपासणी सर्वेक्षण सुरु

जळगांव (निलेश पाटील) – शिवाजीनगर प्रभागामध्ये कोरोनाचा हॉटस्पॉट झालेला असून धर्मरथ फाउंडेशनच्या माध्यमातून महानगरपालिकेचे आरोग्य तपासणी सर्वेक्षण सुरू आहे, ते काम सुरू असतानाच अजून आम्हाला भुरे मामलेदार प्लॉट व काळे नगर परिसरात डेंग्यूचे,मलेरियाचे रुग्ण सुद्धा आढळून आलेले आहे तेव्हा या पार्श्वभूमीवर धर्मरथ फाउंडेशनच्या वतीने आरोग्य विभागास येथील संपूर्ण परिसरात धूर फवारणी करून याकामी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने योग्य त्या उपाययोजना करणेबाबत निवेदन देण्यात आले आहे. धर्मरथ फाउंडेशनच्या वतीने मनपा प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर शिवाजी नगर भागात डेंग्यू व मलेरियाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसर धूर व औषध फवारणी करून निर्जंतुक करण्यात यावा. यावेळी धर्मरथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील आणि प्रकाश मुळीक हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here