सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरनमेन्टचा अहवाल
मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – जगातल्या ५० कोटी बालकांचे कोरोना काळात आरोग्य आणि शिक्षणाचे नुकसान झाले असून त्यापैकी अर्ध्याहून जास्त बालके ही भारतातील आहेत, असं हा अहवाल सांगतोय.
कोरोना काळात सगळ्या जगालाच अडचणींचा सामना करावा लागला होता. या काळात गरीब लोक आणखी गरीब झाले तर अनेकांचे रोजगार गेले. कोरोना काळात भारतातील शून्य ते चार वयोगटातील तब्बल ३७.५ कोटी बालकांच्या आरोग्याचे आणि शिक्षणाचे मोठं नुकसान झालं आहे, असं सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटचा अहवाल सांगतो. .






