मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राज्य परिवहन मंत्रालयाने शनिवारी नवीन दरपत्रक जारी केले आहे. यानंतर आता मुंबईत टॅक्सी आणि ऑटोचे रात्रीच्या प्रवासासाठी लागणारं भाडं वाढणार आहे.
शहरात रात्री प्रवास करण्यासाठी तुम्हाला ऑटोमध्ये किमान 27 रुपये आणि टॅक्सीमध्ये 32 रुपये खर्च करावे लागतील. या वाढीव किंमती 1 मार्च ते 31 मे दरम्यान लागू राहतील, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. यावेळी चालकाला इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये बदल करावे लागतील.
मुंबईत रात्री टॅक्सी आणि ऑटोने प्रवास करणं आता महाग होणार आहे. परिवहन मंत्रालयाने नवीन दरपत्रकं दिली आहेत. 1 जूनपासून भाडं केवळ इलेक्ट्रॉनिक मीटरद्वारे आकारलं जाईल. भाड्याच्या रकमेत झालेल्या या वाढीनंतर ऑटो आणि टॅक्सी शहरात प्रवास करण्याची सर्वात महाग साधनं झाले आहेत. 1 मार्चपासून ऑटोचं किमान भाडं 18 वरुन वरुन वाढवून 21 रुपये होणार आहे. त्याचवेळी टॅक्सीचं भाडं 22 रुपयांऐवजी 25 रुपये होणार आहे. कूल कॅबचं भाडं 28 रुपयांवरुन 33 रुपयांवर पोहोचणार आहे. रात्रीसाठीचं हे दरपत्रक मध्यरात्रीपासून सकाळी 5 वाजेपर्यंत लागू असेल.






