हल्लेखोरांच्या अंदाधूंद गोळीबारात 11जणांचा मृत्यू, 2 जण जखमी

मेक्सिको – येथे ट्रकमधून काही हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. मेक्सिकोच्या पश्चिमेकडे असलेल्या जिलिस्को राज्यात ही घटना घडली आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोळीबारात जखमी झालेल्या दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जलिस्कोमध्ये डिसेंबर महिन्यात माजी गव्हर्नरची हत्या करण्यात आली होती. जलिस्को अंमलीपदार्थांच्या खरेदीविक्रीचे प्रमुख केंद्र आहेत. त्यामुळे या शहरात अशा प्रकारच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. तसेच या शहरात अंमली पदार्थांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. या धंद्यासाठी हे आश्रयस्थान ठरत आहे.

जलिस्को राज्यातील गनडालसारा परिसरात एका घराबाहेर ट्रकमधून आलेल्या हल्लेखोरांनी अचानक अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यात 10 जणांचा मृत्यू झाला असून घरात एका युवकाचा मृतदेह आढळला आहे, असे पोलिसांनी सांगितले. या गोळीबारात जखमी झालेल्या दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे.

राष्ट्रपती अॅण्ड्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रेडोर यांनी 2018 मध्ये पदभार स्विकारल्यानंतर अंमली पदार्थांच्या धंद्यावर नियंत्रण ठेवणार असल्याचे आणि अंमली पदार्थांच्या धंद्यातून होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार असल्याचे सांगितले होते. मात्र, येथे अंमली पदार्थांचा धंदा फोफावत असून ते अंमली पदार्थांच्या तस्करांचे आश्रयस्थान ठरत आहे. तसेच तिथे होणारे हल्ले आणि हत्यांच्या प्रमाणातही वाढ होत आहे. डिसेंबर महिन्यात जलिस्को शहरात माजी गव्हर्नर अरिस्टोटेल्स सँडोवल यांची पर्टोवालार्टाच्या समुद्र किनारी एका रेस्टाँरंटमध्ये हत्या करण्यात आली होती.

शहरात वाढणारे अंमली पदार्थांचे धंदे, हल्ले आणि हत्या रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. ट्रकमधून आलेल्या हल्लेखोरांचा शोध सुरू असून हा हल्ला कोणत्या कारणाने झाला याचा शोध घेण्यात येत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here