वाहतूक खर्चही निघत नसल्याने कर्जतमधील शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला नांगर

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – कोबीच्या एका गड्डय़ाला अवघा एक रुपयाचा भाव मिळाल्याने शेतकऱयाने कोबीच्या उभ्या पिकावर नांगर फिरविल्याची घटना कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे घडली आहे. नाना रामचंद्र सुद्रिक असे शेतकऱयाचे नाव आहे.

कर्जत तालुक्यामध्ये यावर्षी कोबीचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेण्यात आले आहे. मात्र, जादा आवक झाल्यामुळे कोबीचा एक गड्डा केवळ एक रुपयाला विकला गेला. शेतातून कोबी काढून मार्पेट यार्डात नेण्याचा वाहतूक खर्चही वसूल न झाल्याने शेतकऱयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे कोपर्डी येथील नाना सुद्रिक यांनी ट्रक्टरच्या साहाय्याने उभ्या पिकावर नांगर फिरविला आहे.

कर्जत तालुक्यामध्ये मोठय़ा प्रमाणामध्ये पालेभाज्या पिकवल्या जातात. याला सर्वात मोठे मार्केट पुण्यामध्ये मिळत आहे. रोज टेम्पो भरून कर्जतहून पालेभाज्या पुणे येथे विक्रीसाठी पाठवल्या जातात.

कोरोनाच्या काळामध्ये पालेभाज्या चांगल्याच भाव खाऊन गेल्या. यामुळे तालुक्यात मोठय़ा प्रमाणात पालेभाज्यांचे उत्पादन घेण्यात आले आहे. यावर्षी पाऊसदेखील चांगला पडला आहे. मात्र, दुर्दैवाने यावेळी शेतकऱयांच्या पालेभाज्यांना भाव मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here