वैधानिक विकास मंडळावरून अधिवेशनाच्या सुरुवातीला गदारोळ

आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाला कोरोनाचा विळखा, २५ पॉझीटीव्ह

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – गेल्या वर्षी वर्ष २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्यांदा कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळायला लागले. त्यामुळे अर्थसंकल्प मांडल्यानंतर ते अधिवेशन गुंडाळण्यात आले होतं. एक वर्षांनी पुन्हा कोरोनाच्या संकटामुळे अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करावा लागला आहे.

राज्यपाल अभिभाषणात म्हणाले, माझे शासन कर्नाटक महाराष्ट्र विवादाबाबत सुप्रीम कोर्टात ठाम भूमिका मांडत आहे. मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी काम करत आहे. शासनाने कोरोनासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत, धारावी सारख्या भागात यशस्वीपणे कामगिरी केली आहे. विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आक्रमक
विधानभवन अधिवेशन २५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अधिवेशनाच्या आधी दोन दिवस विधानभवन येथे झाल्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण ३२०० जणांच्या चाचण्या झाल्या त्यापैकी २५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये पोलीस आणि माध्यम प्रतिनिधी असल्याची माहिती आहे. बहुतेक आमदार यांनी खाजगी कोरोना लॅबमध्ये चाचण्या केल्या आहेत.

दरम्यान नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात होणार नाही यावर शिक्कामोर्तब झालं आहे. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखालीच विधीमंडळाचं कामकाज चालवलं जाणार आहे.यंदा दहा दिवस होणार आहे. १ ते १० मार्च असे दहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असेल. ८ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून ९ आणि १० मार्च रोजी बजेटवर चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिवेशन समाप्त होईल. यंदाच्या अधिवेशनात अशासकीय ठराव तसंच लक्षवेधी होणार नाही.

अधिवेशनात होणाऱ्या कामकाजाची रुपारेष
– पहिला दिवस (१ मार्च) – राज्यपालांचं अभिभाषण, अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शन प्रस्ताव
– दुसरा, तिसरा दिवस (२ मार्च, ३ मार्च) – राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा
– चौथा, पाचवा दिवस – (४ मार्च, ५ मार्च) – पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान
– सहावा, सातवा दिवस (६ मार्च, ७ मार्च) – शनिवार, रविवारची सुट्टी
– आठवा दिवस (८ मार्च) – अर्थसंकल्प सादर होणार
– नववा दिवस (९ मार्च) – शासकीय कामकाज
– दहावा दिवस (१० मार्च) – अर्थसंकल्पावर चर्चा, अधिवेशनाची सांगता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here