एमआरआय तंत्रज्ञानाचे प्रणेते प्रा. जॉन मलार्ड यांचे निधन

लंडन – मानवी शरीरातील छुप्या रोगांचा शोध घेणारे मॅग्नेटिक रेसोनन्स इमेजिंग (एमआरआय) तंत्रज्ञान विकसित करणारे ब्रिटिश वैद्यकीय भौतिक शास्त्रज्ञ प्राध्यापक जॉन मलार्ड यांचे शुक्रवारी लंडनमध्ये निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 94 वर्षे होते. एबर्डीन विद्यापीठाने प्रा. मलार्ड यांच्या निधनाची बातमी दिली.

प्रा. जॉन मलार्ड यांनी संपूर्ण मानवी शरीराचे स्कॅन करून रोगाची तपशीलवार माहिती करून देणारे एमआरआय स्कॅन तंत्र विकसित केले. त्यांनी पहिले एमआरआय स्कॅन यंत्र तयार करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यांच्या या शोधामुळेच सध्याच्या काळात एमआरआय स्कॅनर यंत्राने कॅन्सरसह अन्य गंभीर आजारांचे आणि शरीराच्या अंतर्भागाला झालेल्या जखमांचे निदान करणे शक्य झाले आहे.

प्रा. मलार्ड यांच्या शोधामुळे शरीरातील छुपे रोग शोधून त्यावर उपचार करणे सोपे झाले आहे. प्रा. मलार्ड यांच्या अद्भुत वैद्यकीय कार्याबद्दल ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांना ओबीई पुरस्काराने सन्मानित केले होते. मलार्ड हे पॉसिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी) इमेजिंग तंत्रज्ञानाचे तज्ञ म्हणून लंडनच्या एबर्डीन विद्यापीठात कार्यरत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here