जळगाव जिल्ह्यात आज २१७ कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.१८) प्राप्त झाल्यानंतर २१७ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ७४९२ झाली आहे.
आज आढळलेल्या २१७ कोरोना संशयित रुग्णांमध्ये जळगाव शहर ९८ , जळगाव ग्रामीण ३, भुसावळ १६ , अमळनेर १०, चोपडा ११ , धरणगाव २, पाचोरा ५ , भडगाव २ , यावल ४ , एरंडोल २३ , जामनेर १२ , रावेर १६ , पारोळा १ , चाळीसगाव १० , मुक्ताईनगर १, बोदवड १, अन्य जिल्हा १ असा समावेश झाला आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची एकूण संख्या ही ७४९२ इतकी झाली आहे. यातील ४६५२ इतके रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात आज २३४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजवर ३८१ रूग्णांचा मृत्यू झाला असून २४५९ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here