विधानपरिषद चे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची नाहूर येथील महापालिकेच्या क्वारांटाईन सेंटरला भेट

ठाणे (मुनिर खान) – विधानपरिषद चे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज सकाळी नाहूर रेल्वे स्टशन जवळील सनरुप इमारत येथील महापालिका (पीएपी) क्वारांटाईन सेंटरला भेट दिली व सेंटरची पाहाणी केली. याप्रसंगी खासदार मनोज कोटक, आमदार मिहिर कोटेजा, भाजपचे विनायक कामत , मुंबई महापालिकचे विभागीय सहाय्यक अधिकारी गांधी आदी उपस्थित होते. या सेंटरमधील डॉक्टर्सना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जेवणाची व्यवस्था नाही, याबाबत पालिकेकडे वारंवार तक्रार करुनही पालिकेने दखल घेतली नसल्याचे डॉक्टर्संना सांगितले. अखेर या डॉक्टर्संनी विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्याकडे आपला प्रश्न मांडला ,त्यानंतर विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी या गोष्टींची तात्काळ दखल घेतली व आज सकाळी या सेंटरला भेट दिली. तेथील डॉक्टर्सकडून सविस्तर माहिती घेतली व तेथे उपस्थित पालिका अधिका-यांना विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी येथील सोयी सुविधा तातडीने करण्याचे निर्देश दिले. यानंतर या सेंटरमध्ये तात्काळ ऑक्वागार्ड व गरम पाण्याची व्यवस्था करण्याचे आणि जेवणाची व्यवस्था करण्याचे तसेच अन्य काही असुविधा असतील त्या दूर करण्याचे आश्वासन मुंबई महापालिकेच्या अधिका-यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here