रामनाथ, ब्राह्मणआळी, चेंढरे, देहेन, शहाबाज, भोनंग, रेवस, चौल, पिंपळभाट, किहीम, नागांव येथील रुग्णांचा समावेश
- 13 रुग्ण कोरोना मुक्त
- बाधित रुग्णांची संख्या 573 वर
अलिबाग-सोगावकर: अलिबाग तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे, आज पुन्हा तालुक्यात 35 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, बाधित रुग्णांचा आकडा 573 वर गेला आहे. यापैकी 226 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, 333 रुग्ण अजूनही कोरोनाशी लढा देत आहेत.
तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज नोंद झालेल्या बाधित रुग्णांमध्ये अलिबाग शहरातील कुंभारआळी-रामनाथ येथील 3, अलिबाग-ब्राम्हणआळी येथील यमुना रेसिडन्सी बिल्डींग येथील 1, नातू रेसिडन्सी-ब्राह्मणआळी येथील 1, चेंढरेतील ज्वेल्स ऑफ अलिबाग येथील 1, नागाव भादाणे येथील 1, देहेन मराठी शाळेजवळील 3, चिंचोटी येथील 1, शहाबाज गणपती मंदिराजवळील 8, अलिबाग गव्हर्नमेंट कॉलनीजवळील हेरंब सोसायटीतील 1, शहाबाज येथील 3, भोनंग 1, रेवसगांव 1, चौल-दादर येथील 1, तुलाडदेवी-चौल येथील 1, पिंपळभाट स्वामी समर्थ नगर येथील कृष्णा पॅलेस येथील 1, पिंपळभाट येथील 1, पिंपळभाट स्वामी समर्थ नगर येथील आनंदवन सोसायटीत 2, किहीम दत्तनगर येथील 2, चेंढरे रोहिदास नगर येथे 1, शहाबाज मारुती मंदिराजवळील 1 अशा 35 रुग्णांचा समावेश आहे.
आज 13 रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. यामध्ये शहाबाज येथील 2, वरसोली ओमकार फ्रेंड्स सर्कलजवळील 1, गोंधळपाडा 1, अलिबाग शहरातील महाविर चौक येथील अथर्व सोसायटी येथील 1, चोंढी नाका येथील 1, वैभव नगर येथील 1, शिवाजी नगर चेंढरे येथील 1, पोयनाड 1, लोणारे 1, धेरंड 2 आणि चेंढरे स्वामी समर्थ नगर येथील 1 रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान, तालुक्यात आजअखेर बाधित रुग्णांनी संख्या 573 वर पोहोचली आहे. यापैकी 226 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 333 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे.
दरम्यान 19-7-2020 पासून लॉकडाऊन मध्ये काही अत्यावश्यक दुकाने काही तासांसाठी उघडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सवलत दिली आहे,तरी सवलतीचा गैरवापर करण्यात येणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे, याबाबत आम्ही काही नागरिकांच्या आज पुन्हा एकदा प्रतिक्रिया घेतल्या,त्या पुढील प्रमाणे…..
अलिबागमध्ये कोरोनाची महामारी वणव्या सारखी पसरली आहे,असे असुन सुद्घा बऱ्याच ठिकाणी नागरिकांना भय राहिले नाही,असे दिसते आहे, सर्वांनी ह्या गोष्टीकड़े गंभीरतेने पाहिले पाहिजे, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, तरी लॉकडाऊन करून, सॅनिटायझर वापरून, मास्क लावून, सोशल डिस्टसिंग पाळून,आदी नियम पाळताना यामध्ये सर्वांनी आपण कुठे कमी पडतो आहोत, याचा विचार करण्याची गरज वाटते आहे,लॉकडाऊन असतांना एव्हढे पेशंट वाढत आहेत,आणि उध्यापासून अजून काही प्रमाणात लॉकडाऊन मध्ये थोडी मोकळीक दिली आहे, तर अजून किती प्रमाणात रुग्ण वाढतील,काय कल्पनाच न केलेली बरी, तरी आपण जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे,तरी सर्वांना कळकळीची विनंती आहे, सर्वांनी घरातच रहावे व आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करावे ही विनंती.
गृहिणी सौ.पूजा मंगेश राऊत-अलिबाग
कोरोना आजाराचे प्रमाण आता वृद्ध व लहान,तरुण वयात येणाऱ्या मुलांमध्ये वाढतय,तरी पालकांनी विशेष काळजी घ्यावयाची आहे,आपल्या मुलांना बाहेर पाठविताना मास्क,सॅनिटायझर, व अंतर म्हणजे सोशल डिस्टनसिंग चा पालन करणे गरजेचे आहे, नाहीतर कोरोना घरी आलाच समजा,आणि उध्या पासून तर जास्तीत जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे,????
गृहिणी सौ.योजना विकास रणपिसे-अलिबाग.







