पुणे (बाजीराव नाईक) – बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि. आणि आदर्श अंगवणे शैक्षणिक सामाजिक संस्था रजि. यांच्यातर्फे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक, महाराष्ट्र राज्य सचिव राजेंद्र सोनवणे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना बाजीराव नाईक यांनी सांगितले की, दलितांच्या सर्व भावना इतरांप्रमाणे सदैव जागृत असतात पण तो इतरांपेक्षा जरा निराळा असतो कारण तो हाडामांसाचा केवळ गोळा नसतो निर्मितीक्षम असतो तो वास्तव जगात कष्टाचे सागर उपसून दौलतीचे डोंगर रचतो अशा या महान मानवावर महाकाव्य रचनारा त्याला हवा असतो. हे १९५८.मध्ये दलित साहित्य संमेलनाच्या उदघाटनपर भाषणातून व्यक्त केलेल्या भावना सांगतांना त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले.
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा लोकशाहीरांचा संदेश उपस्थितांना देत कोरोनाचे सावट आपल्या देशात असताना, सर्वांनी आपल्या घरी राहून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोला वंदन करुन त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करावे, हा संदेश देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.







