सोशल मीडियावर पोस्टद्वारे व्यक्त केली इच्छा
मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) –
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही चित्रपटातील बोल्ड सीनमुळे कायमच चर्चेत असते. सनी सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संपर्कात राहते. सनीचे लाखो चाहते आहेत. नुकतेच सनीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सनीने तिचे हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. हे फोटो सनीच्या लेटेस्ट फोटो शूटमधले आहेत. यात सनीने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. सनीच्या या फोटोपेक्षा सनीच्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. “माझ्याशी लग्न कर” असे कॅप्शन सनीने ते फोटो शेअर करत दिले आहे. या कॅप्शनमुळे सनीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
सनीच्या या फोटोंवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. एक विनोदी कमेंट करत म्हणाला, “अब्बा ऐकणार नाही” दुसरा म्हणाला, “लग्नाच्या आधी घटस्फोट घे”, तर तिसरा म्हणाला, “तुझं तर लग्न झालं आहे ना.”
सनी लवकरच ‘अनामिका’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रम भट्ट आहेत. सनीसोबत अभिनेत्री सोनाली सहगल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त सनी कॉमेडी हॉरर चित्रपट ‘कोका कोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरम्मादेवी’मध्ये दिसणार आहे.






