वेबसिरीज हॅलो मिनीचा दुसरा भाग येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – साधारण दीड वर्षांपूर्वी एम.एक्स. प्लेयरवर ‘हॅलो मिनी’ नावाची एक सस्पेन्स थ्रिलर वेबसिरीज प्रदर्शित झाली होती. ही सिरीज जितकी सस्पेन्स थ्रिलर होती तितकीच बोल्ड देखील होती. ही सिरीज प्रदर्शित झाल्यानंतर खूपच लोकप्रिय झाली. आता या सिरीजचा दुसरा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सिरीजच्या दुसऱ्या सिजनचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘हॅलो मिनी’ या वेबसिरीजच्या पहिल्या भागात मिनीला म्हणजेच अनुजा जोशीला एका अनोळखी व्यक्ती सतत घाबरवून तिला अनेक गोष्टी बळजबरी करायला लावतो. त्या अनोळखी माणसाच्या शोधात मिनीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो, आणि शेवटी ती त्या माणसाला शोधण्यात यशस्वी होते. असा एकंदरीत या सिरीजचा पहिला सिजन होता.

मात्र आता दुसऱ्या सिजनमध्ये मिनीला एका साइकोलॉजिकल थ्रिलरसोबत लढावे लागणार असून, लढताना तिला स्वतःला वाचवायचे देखील आहे. ट्रेलर पाहून तरी हा सिजन मागच्या सिजनसोबत जोडलेला वाटत आहे. यात मिनीला खतरनाक गेम खेळून त्यात उरणारे वेगवेगळे टास्क पूर्ण करावे लागणार आहे. अशातच एक खून होऊन मिनी त्या खुनात मुख्य आरोपी बनते. अशी कथा या सिरीजची असणार आहे.

या सिजनबाबत सांगताना अनुजा जोशी सांगते, ” साइकोलॉजिकल थ्रिलर हा असा जोनर आहे, ज्यात अनेक भयंकर मनोरुग्णांच्या अनेक गंभीर प्रश्नांभोवती आपली कलाकृती फिरते. या सिजनमध्ये देखील एक व्यक्ती मिनीला घाबरवणार आहे. मागचा सिजन प्रेक्षकांना खूप आवडला होता. मला अनेकदा हा प्रश्न विचारला जायचा की पुढचा सिजन कधी येणार आहे. नवीन सिजन येत असल्याने मी खूप खुश आहे.”

एमएक्‍स ओरिजनल सीरीज ‘हॅलो मिनी २’ या सिरीजची निर्मिती अप्‍लॉज एंटरटेनमेंन्‍ट आणि गोल्‍डी बहल यांच्या ‘रोज ऑडियो विजुअल’ यांनी एकत्र येत केली आहे. अनुजा जोशीसोबत गौरव चोप्रा, मृणाल दत्‍त, अंशुल पांडे, निकिता चोप्रा, दर्शना बानिक, विनीत शर्मा, अभिनव शर्मा, अंबिका नायक, जॉय सेनगुप्‍ता, समीर जॅकब यांच्या या सिरीजमध्ये मुख्य भूमिका असणार आहेत. १० भागांची ही सिरीज येत्या २६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here