आमदार रमेश बोरणारे यांच्या तत्पर प्रयत्नाला यश; शहादतपूर ग्रामस्थांनी मानले आभार

वैजापूर (गणेश तांबे) – शहादतपूर येथे तपासणीसाठी आरोग्य पथक आले असता, त्यापैकी एका स्त्री अधिकाऱ्यांचा शुक्रवारी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. याबाबत आ.बोरणारे यांना माहिती मिळाली असता, त्यांनी तातडीने आरोग्य कर्मचाऱ्यांची एक टीम तातडीने शहादतपूर येथे पाठवून, आधी गेलेल्या आरोग्य पथकातील संपूर्ण १८ जणांची वैद्यकिय तपासणी करवून घेतली. त्या सर्वांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर, ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.
केवळ एका फोनवर तत्परतेने प्रतिसाद देत, आरोग्य पथक पाठवून शहादतपूर ग्रामस्थांची चिंता दूर केल्याबद्दल, ग्रामस्थांनी आ.रमेश बोरणारे यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here