अनुराग कश्यप, तापसी पन्नूच्या घरावर आयकर धाडी

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलीवूडचे दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू आणि मधु मनटेना यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. मधु मनटेनाच्या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वॉनच्या ऑफिसवर देखील आयकर अधिकारी पोहोचले आहेत. फँटम फिल्मच्या कर चोरी संदर्भात या धाडी टाकल्या आहेत.

आयकर विभागाच्या सूत्रांचं म्हणणं आहे की, कर चोरी प्रकरणात फँटम फिल्म सोबत जोडलेल्या व्यक्तींवर आयकर विभागाच्या धाडी सुरू आहेत.

यामध्ये अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि अन्य काही नावांचा समावेश आहे. फँटम फिल्म द्वारे कर चोरीच्या प्रकरणात अन्य काही व्यक्तींचा शोध सुरू आहे. आयकर विभागाची पथकं मुंबई, पुण्यासह 20 ठिकाणांवर एकसाथ धाडी टाकत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here