सेक्स सीडी प्रकरणात अडकलेल्या भाजपाच्या मंत्र्याचा राजीनामा

बंगळुरु (कर्नाटक) – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्रातील मंत्री संजय राठोड यांच्यावरील कारवाईसाठी आक्रमक असलेल्या भाजपाला शेजारच्या राज्यात धक्का बसला आहे. एका महिलेला नोकरी देण्याचं आमिष दाखवल्याच्या आरोपामुळे अडचणीत आलेले कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी राजीनामा दिला आहे.

या प्रकरणात जारकीहोळी यांची एक कथित सेक्स सीडी बाहेर आल्यानंतर कर्नाटकातील भाजपा सरकार अडचणीत सापडले होते. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.या प्रकरणाची संपूर्ण कायदेशीर चौकशी केली जाईल असं आश्वासन कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी दिलं आहे. तर, हे सुडाचं राजकारण सुरू असल्याचा आरोप कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सीएन नारायण यांनी केला आहे.

कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी देण्याचं जारकीहोळी यांनी आमिष दाखवलं आणि नंतर त्यांनी ते आश्वासन पाळलं नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे. याबाबतची एक कथित सीडी सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लाहळ्ळी यांनी सादर केली होती.

कर्नाटकातील मंत्र्यांची ही सीडी बाहेर येताच राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर घडलेल्या वेगवान राजकीय घडामोडीनंतर रमेश जारकीहोळी यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. जनता दल सेक्युलर मधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या 17 आमदारांमध्ये जारकीहोळी यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here