चुलत भावासोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसल्याने वडिलांनी छाटले मुलीचे मुंडके

हरदोई (उत्तर प्रदेश) – मुलीला चुलत भावासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्याने संतापलेल्या वडिलांनी मुलीचे मुंडके छाटल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. मुलीची हत्या केल्यानंतर तिची धडावेगळे झालेले शीर घेऊन तिचे वडिल पोलीस ठाण्यात पोहोचले.

मुलीच्या वडिलांना तिचे कुणासोबत तरी अफेयर सुरू असल्याचा संशय होता. त्यामुळे ते तिच्या मागावरच होते. अशातच दोन दिवसांपूर्वी वडिलांनी तिला व तिच्या काकाच्या मुलाला आक्षेपार्ह स्थितीत बघितले. त्यांना नको त्या अवस्थेत बघितल्याने त्यांची तळ पायाची आग मस्तकात गेली. त्यांनी दोघांचाही खून करण्याचा निर्णय घेतला. मात्र ते घरी आले तेव्हा त्यांची मुलगी घरात एकटीच होती.

त्यानंतर त्यांनी घरातील धारदार सुऱ्याने सर्वप्रथम तिला भोसकले नंतर त्याच सुऱ्याने तिचे शीर धडावेगळे केले. त्यानंतर तिचे ते मुंडके हातात घेऊन तो मझिला पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याला अशा प्रकारे आलेले पाहून पोलिसही हादरले. दरम्यान रस्त्याने मुंडके हातात घेऊन जात असताना अनेकांनी त्याचे व्हिडीओ तयार केले आहेत. सध्या त्याचे हे व्हिडीओ व्हायरल झालेआहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here