ओरिओनी खेचलं पारले जी ला कोर्टात

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – गेली 80 वर्षं भारतीयांच्या जिभेचे बिस्किट चोचले पुरवणारी प्रसिद्ध कंपनी पार्ले जीविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात केस दाखल केली आहे. हे प्रकरण बिस्किटांच्या डिझाइनशी संबंधित आहे. पार्लेजीनं आमचं बिस्किटांचं डिझाइन चोरलं म्हणून केस दाखल झाली आहे, तीही जगप्रसिद्ध कंपनीने. भारतात बिस्किटांच्या डिझाईनच्या कॉपीबाबत पूर्वीपासून विविध कंपन्यांची बरीच प्रकरणं कोर्टात गेलेली आहेत. ओरिओ बिस्किटं बनवणारी प्रसिद्ध कंपनी मॉण्डेलीझ इंटरनॅशनलने पार्लेविरोधात दावा ठोकला आहे.

ओरियोनं दावा केला आहे, की पार्ले फॅबियो बिस्किटाचं डिझाईन तंतोतंत त्यांच्या ओरियोसारखं आहे. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं 12 एप्रिलला सुनावणी करण्याचा निर्णय आहे. अमेरिकेच्या मॉण्डेलीज इंटरनॅशनलचं युनिट असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल ग्रेट ब्रँड्सनं ट्रेडमार्कचं उल्लंघन झाल्याचं प्रकरण दाखल केलं. ही माँडेलीझ तीच प्रसिद्ध कंपनी आहे, ज्यांनी कॅडबरीचा ब्रँडही विकत घेतला आहे.

9 फेब्रुवारीला या प्रकरणात सुनावणी झाली. हायकोर्टानं ओरियोच्या वकिलाची तातडीनं सुनावनी घेण्याबाबतचं अपील फेटाळून लावलं. आणि पुढची सुनावणी एप्रिलमध्येच होईल असं सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here