मुंबईच्या वीजपुरवठ्यावर सायबर हल्लाच – ऊर्जामंत्री

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – ऑक्टोबरला वीज पुरवठय़ावर सायबर करून वीज खंडित करून मुंबईकरांना अंधारात ठेवण्यास परदेशी सायबर हल्लाच जबाबदार असल्याचे निवेदन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत सादर केले. मुंबईची वीज ठप्प होण्यामागे घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र सायबर सेलने चौकशी करून अहवाल 1 मार्च 2021 रोजी सरकारला सादर केले होते.

मुंबईत 12 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास विद्युत पुरवठा करणाऱया 400 के.व्ही. वाहिन्यांमध्ये बिघाडामुळे तसेच मुंबईस्थित वीजनिर्मितीचे प्रमाण कमी असल्यामुळे मुंबईचा विद्युतपुरवठा खंडित झाला. त्यामुळे मुंबईचे जनजीवन काही तासांसाठी ठप्प झाले होते. मात्र यामागे घातपाताची शक्यता असू शकते अशी शंका वाटल्याने या प्रकरणाची चौकशी गृह विभागाच्या महाराष्ट्र सायबर सेलकडून करण्यात आली. हे निवेदन आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सदनासमोर ठेवले.

सायबर सेलने त्यांच्या अहवालात आयटी व ओटी रचना एकमेकांपासून वेगळे करणे, पासवर्ड मॅनेजमेंट करणे, वेब ऍप्लिकेशन सुरक्षाविषयक प्रणाली अद्ययावत करणे, आयटी व ओटी रचनेचे अद्यावतीकरण करणे, एसएलडीसीच्या सायबर प्रणालीचे सक्षमीकरण करणे इत्यादी शिफारशी केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here