अखेर संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांची सही

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे अडचणीत आलेले राज्याचे संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर अखेरी मुख्यमंत्र्यांनी सही केली. त्यांचा राजीनामा मंजूर झाला नसल्याबद्दल भाजपने सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता.

अनेक दिवस उलटूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे न पाठवल्याने भाजपकडून टीका करण्यात आली होती. ठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता आहे का? राठोडांचा राजीनामा शिवसेना भवन किंवा मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का? असा प्रश्न भाजपने उपस्थित केला होता.

अधिवेशन सुरु होण्यापुर्वी संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला होता. या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी सही केली असून तो आजच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here