मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनने मुंबईची चिंता वाढवली आहे. ब्रिटनसह विविध देशांमध्ये वेगाने पसरलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन मुंबईत सापडला आहे.
या स्ट्रेनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 4 झाली आहे. सुरुवातीला 90 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी एका व्यक्तीच्या अहवालात नव्या स्ट्रेनचे निदान झाले. आणखी काही रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहे.
कोरोनाविरोधातील लढाईत भारताने गुरुवारी पुन्हा एकदा मोलाची कामगिरी बजाविली आहे. गुरुवारी दिवसभरात देशभरात तब्बल 10 लाखांहून अधिक जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असून आतापर्यंतच सर्वाधिक आकडा मानला जात आहे. सायंकाळी 7 वाजेपर्यंत तब्बल 10.93 लाख जणांना कोरोना लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने जाहीर केली आहे. दरम्यान, आतापर्यंत एपूण 1.77 कोटी जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.






