नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला हे नेहमी त्यांच्या कठोर टीका आणि राजकीय वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. मात्र नुकतेच दिल्लीमध्ये त्यांचे वेगळेच रुप पाहायला मिळालं. झालं असं की पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टर अमरिंदर सिंग यांच्या नातीच्या लग्नामध्ये अब्दुल्ला हे जुन्या चित्रपटांमधील गाण्यांवर थिरकताना दिसले. अब्दुल्ला हे स्वत:च नाचले असं नाही तर त्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही नाचवलं. दोन्ही नेत्यांनी शम्मी कपूर यांच्या एका चित्रपटातील गाण्यावर डान्स केला. ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर’, ‘गुलाबी आंखें जो तेरी देखी’ या गाण्यांवर दोघेही नाचले. फारूक यांच्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय.
मागील आठवड्यामध्ये कॅप्टन यांची नात सहरइंदर कौर हिचा विवाहसोहळा दिल्लीत पार पडला. या विवाहसोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये अनेक मोठ्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. व्हिडीओमध्ये आधी फारूख अब्दुल्ला यांनी ‘गुलाबी आंखें जो तेरी देखी’ या गाण्यावर डान्स केला. त्यानंतर ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर’ गाणं लागल्यानंतर फारूख यांनी कॅप्टन अमरिंदर यांना नाचण्यासाठी खेचून आणलं. या व्हिडीओमध्ये फारूख यांच्यासोबत इतर काही लोकंही नाचताना दिसत आहेत.
Punjab CM @capt_amarinder dancing with MP Farooq Abdullah at Gandaughter's wedding. "Ajjkal Tere Mere Pyaar kei Charche hai":) @OmarAbdullah @RT_MediaAdvPbCM @rohanduaTOI @FromGursimran @ghazalimohammad @tehseenp @nagma_morarji @sushant_says @MattLaemon @HasibaAmin @SaralPatel pic.twitter.com/JmAjY36wA9
— Nasir Khuehami (ناصر کہویہامی) (@NasirKhuehami) March 4, 2021
फारूख अब्दुल्ला यांच्यावर अनेक शस्त्रक्रीया झाल्या आहेत. त्यांचे वयही खूप आङे असं असतानाही त्यांनी अगदी उत्साहामध्ये अमरिंदर सिंग यांच्या नातीच्या लग्नात नाचताना दिसल्याने अनेकजण यांच्या या डान्सवर फिदा झाले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही फारूख यांच्यासोबत डान्स करण्यासाठी कुटुंबातील काही लोकांना डान्स करण्यासाठी बोलवलं. तसेच टाळ्या वाजवून अमरिंदर यांना अब्दुल्ला यांच्या डान्सचं कौतुकही केलं.
व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर हजारोंच्या संख्येने शेअर झाला आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे नेते सरल पटेल यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. “फारूख अब्दुल्ला आणि कॅप्टन अमरिंदर सिग यांनी सिद्ध करुन दाखवलं की वय हे केवळ आकडा असतं,” असं ट्विट पटेल यांनी केलं आहे.






