पी एम पाटील सर,प्रा डी आर पाटील यांनी घेतली लस व नागरिकांनी ही लस टोचून घ्यावी म्हणून केले आवाहन
धरणगाव (उपसंपादक प्रा पी एम पाटील) – धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात covid-19 लसीकरणाची सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य व बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष प्रा डी आर पाटील,महाराष्ट्र ग्रंथालय संघाचे प्रदेश उपाध्यक्ष मा नगराध्यक्ष पी एम पाटील सर यांनी covid-19 लस घेतली सर्व नागरिक बंधू भगिनींनी केंद्र व राज्य शासनाच्या लाभ घ्यावा,कोरोणा योद्धा जेष्ठ नागरिक यांना प्राधान्याने लसीकरण केली जात आहे.
धरणगाव शहरातील नागरिकांना कोणत्याही अफवांना बलि न पडता स्फूर्तिने लस टोचून घ्यावी. एकूण 3 लस टोचण्यात येणार असून वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सूचनेचे पालन करावे असे आवाहन पी एम पाटील सर यांनी केले.
या प्रसंगी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष कडू महाजन,जिल्हा परीट समाजाचे कोरोणा योद्धा छोटू जाधव, ग्रंथालय सेनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेश पी.पाटील,प्रणव वाजपयी,रवी जाधव,डॉ गिरिष चौधरी,किरण विसपुते, श्याम पाटील उपस्थित होते.






