एंटिलिया प्रकरण ठाकरे सरकारला भोवणार?

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी अजय कल्याणे) – एंटिलिया प्रकरणाची चौकशी आता एनआयए मार्फत केली जावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील एंटिलिया या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ जीप आढळून आली होती. याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज पाचव्या दिवशी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

मनसुख हिरेन याचा मृतदेह आज ठाणे शहरा जवळच्या मुंब्रा इथे सापडला आहे. मात्र, मनसुख आणि पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यात घटनेच्या आधीपासूनच मोबाईलवर संवाद झालेले आहेत, त्यामुळे या प्रकरणाची आता एनआयए मार्फत चौकशी करण्याची मागणीच फडणवीस यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here