औरंगाबादेत सोमवारपासून 10 दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता?

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – औरंगाबाद शहरापुढे पुन्हा एकदा कोरोनाचे संकट नव्याने उभे येऊन ठाकले आहे. मुंबईसह, मराठवाडा आणि विदर्भात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतांनाच औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सोमवारपासून लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. गेल्या 24 तासांत 450 रुग्णांची संख्या वाढली आहे. अजून मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शहरात सोमवारपासून शहरात 10 दिवसांचा मिनी लॉकडाउन लागू करण्याची तयारी सुरू आहे. लॉकडाउन लावून रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्याची प्रशासनाची तयारी सुरू झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात 5 तारखेपर्यंत 179 जणांना (मनपा 152, ग्रामीण 27) सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 47909 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 459 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52103 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1284 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2910 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. महानगर पालिकेच्या हद्दीत 353 रुग्ण आढळले आहे. तर ग्रामीण भागात 106 रुग्ण आढळले आहे. तर पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here