उपसरपंच झाले अन् आठ दिवसातच काळाने घातला घाला…

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी ग्रामपंचायतीत उपसरपंच विजय गांगुर्डे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या निधनाने शिरवाडे वणी गावात शोककळा पसरली आहे.

महिना भरापूर्वी निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या शिरवाडे वणी ग्रामपंचायतीत काठावरच्या शह काट शहाच्या लढतीत केवळ विजय गांगुर्डे यांनी शिवसेनेचा हात सोडून राष्ट्रवादीचा हात धरल्याने शिरवाडे वणी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलची सत्ता आली.

उपसरपंचपदी विजय गांगुर्डे विराजमान होऊन ८ दिवस उलटत नाही तोच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाल्याने गावात शोकाकुल वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here